Ration Card Holders List: आता रेशन कार्डधारकांना रेशन ऐवजी थेट पैसे मिळणार, असे करा चेक !

Ration Card Holders List : रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील पिवळ्या शिधापत्रिका (APL) धारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट रोख अनुदान दिले जात आहे.

आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे, निधी वितरणाची प्रक्रिया ही सोपी करण्यात आली आहे. आज आपण या लेखामध्ये या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती पाहूया.Ration Card Holders List

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ration Card Holders List

रेशन ऐवजी पैसे मिळणार; रकमेत मोठी वाढ

  • या योजनेअंतर्गत सुरुवातीला 28 फेब्रुवारी 2023 पासून प्रति लाभार्थी दर महिन्याला 150 रुपये अनुदान दिले जात होते.
  • 20 जून 2024 पासून रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे आणि आता प्रति लाभार्थी दर महिन्याला 170 रुपये करण्यात आली आहे.
    ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारी आहे कारण की त्यांना आर्थिक मदत मिळेल.

निधी वितरणाची प्रक्रिया अत्यंत सोपी

यापूर्वी निधी वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत.

  • 17 जुलै 2025 रोजी राज्य शासनाला एक पत्र पाठवण्यात आले होते.
  • त्यानंतर यावर प्रतिसाद म्हणून 25 जुलै 2025 रोजी अन्न, नगरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने विशिष्ट अधिकाऱ्यांची (लेखा अधिकारी, नगरी पुरवठा वित्तीय सल्लागार आणि उपसचिव, मुंबई) नियुक्ती केली आहे.
  • या अधिकाऱ्यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव,अन्न व नागरी पुरवठा यांना नियंत्रण अधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होतील आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार धान्य किंवा इतर वस्तू खरेदी करण्याची मुभा मिळेल .ही योजना शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदतच नाही तर शेतकऱ्यांना निर्णय घेण्याची स्वातंत्र्य ही देते .

हा घेण्यात आलेला निर्णय फक्त वर्धा जिल्ह्यातील पिवळ्या शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे .इतर जिल्ह्यातील शेतकरी आणि इतर शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे की नाही,याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.अधिक माहितीसाठी आणि या शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहण्यासाठी,तुम्ही maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.Ration Card Holders List

Leave a Comment