Weather Update : मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे तसेच आणि अजून पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे, आज पासून पुढील काही तासांमध्ये विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये विशेषता: नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी या या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आव्हान करण्यात आले आहे.Weather Update

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी सावध राहावे.
- विदर्भातील या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट : विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- विदर्भातील या जिल्ह्यांसाठी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता: विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Weather Update
मराठवाड्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाकडून मराठवाडा विभागासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिली आहेत. मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
- मराठवाड्यात येलो अलर्ट (मुसळधार पाऊस): मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहावे असे आव्हान देण्यात आले आहे .
- मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट (अति मुसळधार पाऊस): नांदेड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, या भागात अतिवृष्टी होऊ शकते, ज्यामुळे पूर आणि दरड कोसळण्याची शक्यता असते. या भागातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- हलका ते मध्यम पाऊस : मराठवाड्यात धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
मध्य आणि उत्तर महाराष्ट्र
मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषता: नाशिक आणि जळगाव मध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदू बार आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण
- अति मुसळधार पाऊस: कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आली आहे.
- मुसळधार पाऊस : मुंबई सह पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील नागरिकांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. Weather Update