चर्चगेट-विरार लोकलमधील तरुणींचे गुपचूप फोटो आणि व्हिडिओ काढून अश्लील सामग्री तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३१ वर्षीय शिंपी मोहम्मद साबिर रुस्तम याला अटक केली. महिलांचे फोटो-व्हिडिओ वापरून त्याने एआयच्या मदतीने अश्लील रील तयार केली आणि ती इन्स्टाग्रामवर टाकली. मुंबई लोकलमधील महिलांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
#मुंबई #मुंबईलोकल #चर्चगेटविरार #महिलासुरक्षा #सायबरगुन्हा #एआय #पोलीसकारवाई